HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, जमावाने फोडली गाडी

सोलापूर | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका व्यक्तीला उडवल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला धडक दिली त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बार्शी-लातूर बायपास रोडवरील बीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शेळगाव फाटयाजवळ झाला.

या अपघातात या भीषण अपघातात शामकुमार देविदास व्हळे (वय ४० )राहणार व्हळे शेलगाव हे जागीच ठार झाले. मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांच्या गाडीती तोडफोड केली. सावंत यांच्या फॉर्चुनर गाडीने स्पेलंडर एनएक्स एमएच१३एक्यू २७८२ या गाडीने व्हळे यांना जोराची धडक दिली.

दरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा एकत्र चिपळूण दौऱ्यावर

News Desk

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवण्याची शक्यता

News Desk

“माझ्याकडे १० वर्ष कृषी खातं होतं, पण शेतकऱ्यांवर….”, शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला हल्ला!

News Desk