HW News Marathi
महाराष्ट्र

‘मातोश्री’ला दोन कोटी अन् ५० लाखांचे घड्याळ; यशवंत जाधवांच्या डायरीतून आयकर विभागाला मिळाली नवी माहिती

मुंबई | नुकतेच आयकर विभागने मुंबई महापालिकेचे स्थाय समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर केलेल्या कारवाईत डायरी सापडली. या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने जाधवांना विचारल्यावर ते म्हणाले, “मातोश्री म्हणजे माझ्यासाठी आई आहे,” असे ते म्हटले.

डारीत गुढी पाडव्याच्या दिवशी २ कोटी रुपय आणि ५० लाखांचे घड्याळ भेट वस्तू म्हणून मातोशीला देण्याचा उल्लेख आहे. जाधव कुटुंबीयांच्या निकटवर्तीय सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी आयकर विभागने छापेमारी केली होती. या छाप्यादरम्यान आयकर विभागाने कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापले असून त्यांनी ते जप्त केले आहे. या पुराव्याच्या झाडाझडततून सुमारे १३० कोटी रुपयापेक्षा जास्त आणि ३६ जुन्या पघडीच्या इमारीत विकत घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे.

जाधव यांची सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळ्यातील इम्पिरियल क्राउन हे हॉटेल खरेदी केली होती. या हॉटेल न्यूज हॉक मल्टीमीडियाने भाड्याने घेतले होते. न्यूज हॉकला मुंबई पालिकेच्या क्वारंटाइन सेंटर कंत्राट मिळाले. हे हॉटेल १.७५ कोटीला खरेदी करण्यात आले होते. परंतु, विकाताना हॉटेलची किंमत २० कोटी ऐवढी झाली. न्यूज हॉक मल्टीमीडियाच्या व्यवहारातील व्यवहारच्या संशयावरून आयकर विभाग तपास करत असून या कंपनीचे मालक विमल अग्रवाल यांचाही तपास आयकर विभाग करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबासाहेबांचे स्मारक २०२० पर्यंत होणार | मुख्यमंत्री

News Desk

हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील साखरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी…!

Aprna

“मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद व निरर्थक”- अतुल भातखळकर

News Desk