HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याचे प्रमाण मोठे, सोमय्यांनी राज्यापालांकडे मांडली व्यथा

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून मुंबई कोरोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत. असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज (१२ जून) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेते रुग्णालय सुरू असलेल्या गोंधळाबद्दल चिंत व्यक्त केली असून मुंबईत किमान अर्धा डझन करोना बाधित रुग्णांचे मृतदेह गायब होत असल्याचे सांगत राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.

या भटीसंर्भात सोमय्या यांनी ट्वीट करत माहिती, “अर्धा डझन कोरोना पेशंट, ज्यांना हॉस्पीटल नी गायब घोषित केले नंतर त्यांचा मृतदेह सापडला,अशा परिवाराची आज महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घालून दिली. गृह व आरोग्य सचिवांना ह्यात लक्ष घालण्याचे सांगणार, असे त्यांनी सांगितले.”

दरम्यान, गेल्या आठवडाभरात मुंबईतील विविध रुग्णालयांमधून सहा मृतदेह गायब झाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटनांकडे लक्ष वेधले आणि दोषींवर कारवाई करण्याचा मागणी केली.

सोमय्यांनी पत्रात कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर मिळाला होता. त्याआधी परळ येथील केईएम रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालय तसेच वरळीतील रुग्णालयातूनही अशाचप्रकारे मृतदेह गायब झाल्याचे आढळून आल्याची माहिती दिली.

संबंधित बातम्या

किरीट सोमय्यांनी कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या घटनांची चौकशीसाठी आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खुप आले,आम्ही त्यांना धडा शिकवू,संजय राऊत भिडेंवर भडकले !

News Desk

#Coronavirus : रोटी फाऊंडेशन आणि मुंबई पोलिसांनी अन्नाचे वाटप करून गोरगरिबांना दिला मदतीचा हात

swarit

‘कोविड’साठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे १२३ कोटी खर्च

News Desk