HW News Marathi
महाराष्ट्र

आशिष शेलारांच्या भावावर पोलिसांनी ‘या’ प्रकरणात केला गुन्हा दाखल

मुंबई | ‘मशिदीवरील भोंग्यांसमोर हनुमान चालीसा लावा,’ अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेतून घेतली आहे. यातून मनसेसोबत भाजपने देखील राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मालवणी परिसरामध्ये एका मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजपचे आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार आणि भाजप युवा मोर्चाचे नेते तेजिंदर सिंग तिवाना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रामनवमी निमित्ताने मालवणी परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मशिदीमध्ये अजान सुरू असताना लाऊडस्पीकर वाजवण्यात आला. 

या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय रामनवमीच्या मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये मशिदीसमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लाऊडस्पीकर लावून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे ताब्यात घेतले आहे. आणि पोलिसांनी भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह ३० ते ३५ जणांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

रावनमीच्या दिवशी मानखुर्दुमध्ये साठेनगर म्हाडा कॉलनी परिसरात रात्री दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारी झाले. यावेळी दोन गटांनी लाठ्याकाठ्या आणि तलवारी घेऊन तरुणांनी रस्त्यावर उतरले. या गटांने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोच केली. या प्रकरणात मानखुर्द पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांवर गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर मराठ्यांचे ठिय्या आंदोलन

swarit

लम्‍पीतून ३ हजार २९१ जनावरे रोगमुक्त; पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती

Aprna

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर ‘या’ खात्याची तात्पुरती जबाबदारी

News Desk