HW News Marathi
Covid-19

मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून

मुंबई । परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल.यासंदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे.

लॉकडाऊनमुळे परराज्यांतील लाखो मजूर राज्यातील विविध भागांत अडकले पडले आहे. आतापर्यंत हजारो श्रमिकांना त्यांच्या राज्यात रेल्वेतून सोडण्यात आले आहे. अजूनही हजारो श्रमिक राज्यात आहेत. मात्र, काही कुटुंबांकडे गावी जाण्यासाठी पैसे नाहीत. रेल्वे प्रवासाच्या तिकीटाची रक्कमही ते भरू शकत नाहीत. ही गोष्टी लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून रेल्वे तिकीटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक! मुंबईत १ हजार ८३७ कोरोना रुणांची नोंद, तर ११ जणांचा मृत्यू

Aprna

लवकरात लवकर वाहतूक चालू करा नाही तर पुन्हा आंदोलन करू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

swarit

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार!

News Desk