HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यात तर भाजपचे सरकार येणारच, फक्त आम्ही आज, उद्या, परवा करत नाही!”

मुंबई | “राज्यात तर भाजपचे सरकार येणार आहे. फक्त आम्ही भविष्यवाणी आज, उद्या, परवा करत नाही. राज्याच्या भविष्यासाठी भाजप सरकार शिवाय दुसार पर्याय नाही,” असे म्हणत राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. दरेकरांनी आज (२७ नोव्हेंबर) नंदुरबार येथे पत्रकार परिषद बोलत होते. “राज्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गाने न्यावयाचे असल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा पूर्ण भ्रमनिरास केला आहे,” असा टोला राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडीला लगावला आहे.

“राज्यात तर भाजपचे सरकार येणार आहे. फक्त आम्ही भविष्यवाणी आज, उद्या, परवा करत नाही. राज्याच्या भविष्यासाठी भाजप सरकार शिवाय दुसार पर्याय नाही. हे तीन तिघाडी सरकार महाराष्ट्राचे कधीच भले करू शकणार नाही. कारण तुम्हाला सरकार चाविण्याकरिता एक वाक्यता लागते. राज्याचे मुख्यमंत्री वेळ देताना दिसत नाही. यामुळेच राज्याचे सर्व प्रकल्प ठप्प आहे. तसेच मराठा समजाला आज आरक्षण मिळालेल नाही. त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखविले आहे. तसेच राज्यात पुन्हा सर्व कामे सुरळीत होण्यासाठी भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे,” असे दरेकर म्हणाले.

नारायण राणे नेमके काय म्हणाले

“मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही,” अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली आहे. राज्यात अनोगोंदी कारभार असून भाजपचे सरकार नाही, त्यामुळेच असे होत आहे, असे राणेंनी काल (२६ नोव्हेंबर) दिल्लीत प्रसार माध्यमांंशी बोलताना म्हणाले. माझ्या मनात काही गोष्टी तर आहे. पण मी त्या आताच सांगणार नाही. राज्यात नवे सरकार पाडायचे असेल किंवा नवे सरकार आणण्याचे असेल. तर काही गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात, असा इशारा देखील राणेंनी दिला आहे. राणे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हे आजारी असल्यामुळे आजारी माणसाचे नाव घेऊन काही बोलणे योग्य वाटणार नाही. परंतु महाविकाआघाडी सरकारचे लाईफ अधिक नाही, असे सूचक विधान राणेंनी केले आहे. राणेंच्या भविष्यवाणीवरून राजकीय वर्तुळा चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे! – सामना 

News Desk

CSD बिपीन रावत यांचे पार्थिव पालम विमानतळावर पोहोचणार

News Desk

राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो,तलवार कुणा विरोधात उपसणार? विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना प्रश्न

News Desk