HW News Marathi
महाराष्ट्र

PandharpurElection : आघाडी पिछाडीचा खेळ सुरुचं, समाधान आवताडे १६व्या फेरी अखेर आघडीवरच!

Lपंढरपूर | राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे मात्र निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती. १७ एप्रिलला या पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडले होते.राज्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. दरम्यान,१७ एप्रिलला या मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली होती.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचेच सुपुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ह्याच दोन उमेदवारांमध्ये मोठी चुरशीची लढत आहे. भाजप-राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.

आज (२ मे) या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या विधानसभेच्या या निवडणूकींचे मतमोजणीत सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे.या मतमोजणीत आघाडी आणि पिछाडीवर खेळ सुरुच आहे. कधी भगीरथ भालके आघाडीवर येताना दिसत आहेत तर कधी समाधान आवताडे पुढे येताना दिसत आहे.

पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर होते तर राष्ट्रवादी पिछाडीवर होते. त्यानंतर ही खेळी पलटत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आघाडीवर आले होते.

पंढरपूर मंगळवेढा निवडणूक

१ली फेरी

भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर

२री फेरी

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके

१०० मतांनी आघाडीवर

३री फेरी

भगीरथ भालके – ८६२३

समाधान आवताडे – ७९७८

६३५ मतांनी भालके आघाडीवर होते.

४थी आणि ५वी फेरी ( ५३१ मतांनी भालके आघाडीवर)

भगीरथ भालके – ३३२८

समाधान आवताडे – ३३२५

६वी फेरी

सहाव्या फेरीत राष्ट्रवादीचे भगीरथ ६३८ मतांनी आघाडीवर होते

७वी फेरी

सातव्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे यांची १००० मतांची आघाडी आहे.

८वी फेरी

आठव्या फेरी अखेर २२६५ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

१०वी फेरी

भगीरथ भालके दहाव्या फेरीत पिछाडीवर असून २८७७६ मत घेत समाधान आवताडे आघाडीवर आहेत.

११ वी फेरी

१३०८ मतांनी समाधान आवताडे आघाडीवर

१२ वी फेरी

समाधान आवताडे – ३३२२९

भगीरथ भालके – ३२०१५

भाजप उमेदवार आघाडीवर

१३ वी फेरी

समाधान आवताडे – ३५८९३

भगीरथ भालके – ३४८३४

भाजप उमेदवार आघाडीवर

१४ वी फेरी

समाधान आवताडे – ३५८९३

भगीरथ भालके – ३४८३४

१५ वी फेरी

१५ व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे ३८०० मतांची आघाडी घेत पुढेच आहेत.

१६ वी फेरी

१६ व्या फेरी अखेर समाधान आवताडे यांना ४२०० मतांची आघाडी

१७ वी फेरी

१७ व्या फेरीपर्यंत पंढरपूर तालुक्यातील मतदान मोजले जाईल.

१८ वी फेरी

१८ व्या फेरीपासून मंगळवेढा तालूक्यातील मतमोजणी होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पहाटेच्या शपथविधीमुळे फायदा एकच झाला…”, शरद पवारांचा वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Aprna

साप अंगावरून गेला अन मी मुख्यमंत्री झालो: शरद पवार

News Desk

विखे-पाटलांचे जावई कॉंग्रेसमध्ये! पिता-पुत्रही घरवापसी करणार का? 

News Desk