HW News Marathi
देश / विदेश

WestBengalElection : सुरुवातीचे कल हाती, तृणमूलला स्पष्ट बहुमत

पश्चिम बंगाल| पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? याचे आज (२ मे) हे चित्र स्पष्ट होणार आहे. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून कोरोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे पहावं लागणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे.

पश्चिम बंगालमधील सर्व २९२ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यानुसार तृणमूल काँग्रेस मोठी आघाडी घेण्याची शक्यता असून स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे.

अनेक फेऱ्या असल्याने सध्या काहीही बोलणं घाईचं ठरेल. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आम्ही तीनपासून सुरुवात केली होती. १०० जागाही मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता, पण आम्ही तो ओलांडला आहे. आम्ही बहुमताचा आकडाही पार करु असा विश्वास भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियानमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर, राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी!

News Desk

कांजुरमार्ग मेट्रो कारशेड संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी -संजय राऊत

News Desk