HW News Marathi
महाराष्ट्र

नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांनी मंत्रालयात जावून घेतली उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

मुंबई | कोल्हापूर उत्तरच्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांचे अभिनंदन केले.

कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांनी मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघांच्या विकासासाठी तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगले काम करा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही देत नवनिर्वाचीत आमदार जयश्री जाधव यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

राज्यात लवकरच दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

News Desk

शहीद जवान किरण थोरात यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk