HW News Marathi

Related posts

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला NCBकडून क्लिनचीट

Aprna

राज्यपाल नियुक्त आमदार ठरण्याची शक्यता, राष्ट्रवादी राजू शेट्टीना दिलेला शब्द पाळणार?

News Desk

“आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत?”, मुख्यमंत्री सभागृहात बरसले

News Desk
देश / विदेश

कंत्राटदारांनी शिवस्मारकाच्या रचनेत स्वतःला वाटतील तसे बदल केले !

Gauri Tilekar

मुंबई | शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांना कोणतीही कल्पना न देता कंत्राटदार आणि सल्लागारांनी स्मारकाच्या रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केले आहेत असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. तसेच चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि शिवस्मारक कृती समितीला कोणतीही कल्पना न देता हे बदल केल्याचा आरोप देखील मेटे यांनी केला आहे. कंत्राटदार आणि सल्लागारांनी रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केल्यामुळे पुढे मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी या पत्रात लिहिलेले आहे. शिवस्मारकाची उंची २१० मीटरवरुन २१२ मीटर एवढी वाढविण्यात आली आहे.यासाठी स्मारकाचा खर्च ८१ कोटींनी वाढत असल्याचे दाखवण्यात आले आहे. कोणाच्या परवानगीने ते वाढविण्यात आले ? असा सवाल मेटे यांनी केला आहे.

Related posts

आपचे २० आमदार अपात्र घोषित

swarit

हैदराबादमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, ११ मंजुरांचा मृत्यू

Aprna

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली  

News Desk