HW News Marathi
महाराष्ट्र

‘राजीनामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला, ती पहिलीच वेळ असावी’ – संजय राठोड

नाशिक। मुख्यमंत्र्यांना वाटेल तेव्हा ते मला परत मंत्रिमंडळात घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी दिली. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राठोड यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने राज्यभर ‘ बंजारा ‘ समाज बांधवांशी संवाद आयोजित केला आहे. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते, त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

पत्रकार परिषद घेऊन वाचून दाखवला

याबाबत संजय राठोड म्हणाले, “माझ्यावर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी मी स्वतःहून राजीनामा दिला. माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वाचून दाखवला. बहुदा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो वाचून दाखवावा ही पहिली वेळ असावी, त्यामुळे माझ्यावर मुख्यमंत्र्यांचे असलेले प्रेम अधोरेखीत झाले”मंत्रिपदाच्या दबावासाठी नव्हे तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या समाज संघटनेच्या माध्यमातून राज्यभर ‘ बंजारा ‘ समाज बांधवांशी संवाद साधून, समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

सामाजिक कार्य सुरु आहे

मंत्रिपदाच्या दबावासाठी नव्हे तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या समाज संघटनेच्या माध्यमातून राज्यभर ‘ बंजारा ‘ समाज बांधवांशी संवाद साधून, समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.राजकारण हा माझा व्यवसाय नाही, ज्या समाजातून मी आलोय त्या समाजाचा मी देणे लागतो. म्हणून माझे हे सामाजिक कार्य सुरु आहे, असं संजय राठोड यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांना वाटेल तेव्हा ते परत मंत्रिमंडळात घेतील, असं संजय राठोड म्हणाले.

यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते

माजी मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपां प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं सूचक ट्वीट संजय राठोड यांनी केलं होतं. संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हताश, थकलेल्या लोकांची देशाला गरज नाही !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत  

News Desk

सचिन वाझे अटक प्रकरणात शरद पवार आणि अनिल देशमुख काय म्हणाले ?

News Desk