सेउल | उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी अमेरिकन वृत्तपत्रांनी दिली आहे. किम यांच्यावर हृदयविकारासंबंधी शस्त्रक्रिय झाली असून यानंतर त्यांची प्रकृतीला गंभीर झाल्याची माहिती वृत्त पत्राने दिली आहे. किमवर १२ एप्रिल रोजी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त उत्तर कोरियातील बातम्या पुरवणाऱ्या दक्षिण कोरियामधील ‘डेली एनके’ या ऑनलाइन वृत्तपत्राने दिले आहे. ‘सीएनएन वाहिनी’ने ‘डेली एनके’च्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
The South Korean government on Tuesday was looking into US media reports saying North Korean leader Kim Jong Un was in fragile condition after surgery: The Associated Press (file pic) pic.twitter.com/8POavzvVYi
— ANI (@ANI) April 21, 2020
किम हे त्यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या १५ एप्रिलच्या कार्यक्रमाला त्यांची अनुपस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेला उधाण आले. यामुळे किंम यांच्या आरोग्याबद्दल उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. उत्तर कोरिया आपल्या नेत्याभोवतीच्या कोणत्याही माहिती बाहेर जावून देत नाही. मात्र, अमेरिकन गुप्तचर संस्था उत्तर कोरियातील घडामोडींवर लक्ष ठेवत असते.
किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शासकीय माध्यमांमधील गैरहजेरीमुळे किमच्या आरोग्याबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. वर्षानुवर्षे किम जोंग उन किंवा त्याच्या वडिलांच्या आरोग्याविषयी अनेक चुकीच्या अफवा पसरल्या जात आहेत. त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने नाही. मात्र, उत्तर कोरियाच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.