HW News Marathi
महाराष्ट्र

पीएमसीचे सहकारी बँकेत विलीनीकरणाच्या राज्य सरकारच्या हालचाली सुरू

मुंबई | पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पीएमसीचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याच्या हालचालींना राज्य सरकारकडून सुरू झाल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. जयंत पाटील पुढे म्हणाले की, पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीन करण्याचा विचार पुढे येत आहे. राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला तशी विचारणा करण्यात आली आहे. गरज पडल्यास या दोन्ही बँकांचे विलीनकरण करण्यासाठी आरबीआयशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशभरात शाखा असलेल्या पीएमसी बँकेत साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दीड महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने बँकेवर निर्बंध आणले. त्यामुळे हजारो खातेदारांची कोट्यवधीची रक्कम अडकल्याने ऐन दिवाळीत त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काहींना अटक केली. दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (३ डिसेंबर) आणखी तिघांना अटक केली. तत्कालीन संचालक जगदीश मुखी, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्य मुक्ती बावीसी, संचालक आणि कर्जवसुली (रिकव्हरी) समिती सदस्या तृप्ती बने अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रशिया-युक्रेन संघर्षावर शरद पवारांनी केले भाष्य; म्हणाले….

News Desk

अजित पवार आणि अनिल परबांविरुद्ध CBI चौकशी करण्याची मागणी, कोर्टात याचिका दाखल

News Desk

सेना- मनसे- भाजप – असा प्रवास करत सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये स्थिरावणार

News Desk