HW News Marathi
Covid-19

अमोल कोल्हेंचा कोरोनावरील ‘फॅबीफ्लू’ औषधाला आक्षेप, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दररोज वेगवेगळ्या कंपन्या कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा करत आहेत. बाजारात कोरोनावर निरनिराळी औषधांमुळे गोंधळ वाढू लागला आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या डॉ. अमोल कोल्हेंनीही अशाच एका औषधावर आक्षेप घेतला आहे. तसेच अमोल कोल्हेंनी ग्लेनमार्क कंपनीच्या फॅबिफ्ल्यू या औषधाच्या एकूण दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक सविस्तर पत्र देखील लिहिले आहे. याबाबत कोल्हेंनी ट्वीट करत यांची माहिती दिली आहे.

अमोल कोल्हेंनी ट्वीमध्ये म्हटले, “ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोविड-१९ वर फॅबीफ्लू नावाचे औषध बाजारात आणले आहे.परंतु या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे.त्यामुळे याची किंमत कमी करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.”

कोल्हेंनी पत्रात म्हटले, “कंपनीच्या म्हणण्यानुसार रुग्णांना १४ दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील. १४ दिवसांत रुग्णांनी १२२ गोळ्या खायच्या आहेत. त्या सर्व गोळ्यांचा एकूण खर्च १२ हजार ५०० रुपये होत आहे. एवढी किंमत सर्वसामान्यांना परवडणार आहे का?, असा सवाल कोल्हेंनी केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णावर याची चाचणी घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. पण औषधाची किंमत ठरवताना गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसत नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० टक्के कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील; मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

Aprna

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टातील ‘ती’ याचिका मागे

News Desk

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फेल?”, मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

News Desk