मुंबई |मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील नाट्यगृहे आणि सिनेमागृहे पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतरही काही थिएटरचालकांनी सरकारच्या आदेशाला धुडकावले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी करण्यात आल्यानंतरही मुंबईतील काही थिएटरमध्ये आज (१४ मार्च) तिकीट विक्री सुरु होती.
मुंबई, नवी मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवडमधील, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव आज (१३ मार्च) मध्यरात्रीपासून ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा आणि महाविद्याल बंद ठेवण्यात निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray: All schools in Pune and Pimpri-Chinchwad will be closed till further notice except for class 10th and 12th examination. https://t.co/peSkYbpHOx
— ANI (@ANI) March 13, 2020
रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे रेल्वे आणि बस सेवा सुरू राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यातील नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, मॉलमध्येही जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जनतेने गरज असले तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला केले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्य रुग्णालय आणि खासगी रुग्णालय सज्ज असून राज्यातील कोरोनाचे रुग्ण हे दुबई आणि अमेरिकेतून आलेल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, “राज्यात तपासणी केंद्र वाढविण्याबाबत केंद्रसोबत चर्चा करून असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, राज्य सरकारकडून धार्मिक, राजकीय आणि संस्कृतीक कार्यक्रम राज्य सरकारकडून रद्द करण्यात आले असून येत्या काळात अशा प्रकारच्या कार्यक्रमाना परवानगी देण्यात येणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.”
पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह
पुण्यात कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे आता पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्ये वाढ होऊन १० वर गेली आहे. अमेरिकेतून परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज माध्यमाशी बोलताना सांगितले. म्हैसेकरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात १०, मुंबई ३, ठाणे १ आणि नागपूर ३ एकूण राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर केली आहे. तर पुण्यात ३११ संशयित असून त्यांना देखरेखीखालील ठेवण्यात आले आहे. यावेळी म्हैसेकर म्हणले की, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवू नका, आणि जे संशयित आहेत त्यांनी खराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी माध्यमातून लोकांना केले. देशात कोरोनाग्रस्ताची संख्या ७८वर झाली आहे.
देशातील करोनाग्रस्ताची अशी आहे संख्या
देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्यांमध्ये केरळ आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यात १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.उत्तर प्रदेश ११, दिल्ली ७ कर्नाटक ५ , पंजाब १, लडाख ३, राज्यस्थानमध्ये दोन परदेशी पर्यटक आणि १ भारतीय, तामिळनाडू १, तेलंगणा १ आणि हरियाणा १४ हे सर्व परदेशी पर्यटकांना कोरोनाची लागण झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.