HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईच्या रस्त्यावर खर्च केलेले २१ हजार कोटी गेले कुठे ?

मुंबई। पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या सुरू होते, तर यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर जूनचा दुसरा पंधरवडा कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरातील विविध भागांत खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.कोरोनाच्या निर्बंधामुळे तुलनेने कमी वाहने रस्त्यावर असतानाही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणाऱ्या दादर, माहीम, गोरेगाव, जोगेश्वरी, माटुंगा, कुर्ला, चेंबूर या रस्त्यांवर खड्डे असल्याने त्यातून वाट काढत वेगवान प्रवासासाठी वाहने महामार्गावर येतात. मात्र खड्ड्यांमुळे आधीपासूनच रांगा लागलेल्या असल्याने महामार्गावरची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून मंदगतीने सुरू आहे.मात्र या रस्त्यांसदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

21 हजार कोटी गेले कुठे ?

मुंबई महापालिका मुंबईतल्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचं समोर आलंय .1997 नंतर मुंबईतल्या रस्त्यांवर महापालिकेने 21 हजार कोटी रुपयाचा खर्च केल्याचं माहिती अधिकारात समोर आलं आहे. 2013 आणि 14 या वर्षात सर्वाधिक खर्च झाल्याचं समोर आल आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित साटम यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारात ही माहिती पुढे आली आहे. मात्र तरीही मुंबईतले रस्त्यांवरची अवस्था आजही तशीच आहे. म्हणून आता मुंबईकरांना प्रश्न पडू लागलाय की 21 हजार कोटी नेमके कुणाच्या घशात गेले?

कोट्यावधी रुपयांचे रस्ते खड्ड्यात !

मुंबईत दरवर्षी रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यानंतरही रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार कायम आहेत. रस्त्याच्या हमी कालावधीत पडलेले खड्डे कंत्राटदारांकडून बुजवून घेतले जातात, तर इतर खड्डे पालिका स्वतः बुजवते. मात्र किती खड्डे बुजवले जातात याची माहिती प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे एखाद्या भागातील नागरिकाने स्वतः पाहिलेल्या चार खड्ड्यांची माहिती पालिकेच्या पोर्टलवर दिली तरी संबंधित विभागात प्रत्यक्षात त्यातून अधिक खड्डे असतात. प्रसारमाध्यमे पालिकेने दिलेली खड्ड्यांची आकडेवारी प्रसिद्ध करतात. मात्र खड्ड्यांची संख्या त्याहून जास्त असल्याने पालिकेवर नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जाते आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर खड्ड्यांची छायाचित्रे आणि त्यावर विनोद आणि संताप अशा दोन्ही भावनांचे मिश्रण असलेल्या पोस्टचे प्रमाण देखिल वाढू लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला फॉर्म बनावट

swarit

ईडी चौकशी संदर्भातल्या वक्तव्यावरुन किरीट सोमय्या शरद पवारांवर संतापले

News Desk

आम्ही प्रसिद्धीच्या उद्देशाने मदत केली नाही- जयंत पाटील

Arati More