HW News Marathi
महाराष्ट्र

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात ५०० पदांसाठी भरती

मुंबई | मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी  २०१९ मध्ये २ हजार ९०५ रिक्त पदे भरण्यासाठी मंजुर करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात १ हजार ७४१ पदे भरली गेली असून १ हजार ६४ पदे रिक्त आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई पदासाठी ५०१ रिक्त पदे आहेत. तर सदर पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान ११ महिने कालावधीसाठी एकूण ५०० शिपाई महाराष्ट्र राज्य सुरक्षा महमंडळाकडून घेण्याची विनंती पोलीस महासंचालक यांनी केली होती.

दरम्यान, पोलीस महासंचालक यांच्या या विनंतीला वित्त विभागाने गठित केलेल्या उपसमितीच्या शिफारसीस अनुसरुन मान्यता देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालया अंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याची कार्यवाही पुर्ण होईपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ११ महिन्यांकरिता एकूण ५०० शिपयांचे मनुष्य बळ घेतलं जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Aprna

नांदेड जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय ! पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणतात..

News Desk

उद्धव ठाकरेंचा निरोप आला आणि फडणवीसही थांबले, कोल्हापूरात केली एकत्र पाहणी

News Desk