HW News Marathi
महाराष्ट्र

“… तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही”- अण्णा हजारे


मुंबई। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि आता या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत कर्मचारी आणि नागरिकांनाही सरकारवर दबाव वाढविण्याचा सल्ला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही अण्णा हजारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाजवळ दर्शविली आहे.

सरकारला जाग येत नसेल तर….

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देत, त्यावर चर्चा केली. ती ऐकून घेतल्यानंतर आण्णा हजारे म्हणाले, सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी लाखो नागरिकांनी एकाचवेळी बाहेर पडले पाहिजे. दबाव आल्याशिवाय आणि सरकार पडू शकते, असे वाटल्याशिवाय कोणतेही सरकार हालत नाही. मात्र, कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची यामध्ये हानी होता कामा नये, असेही हजारे यांनी कर्मचाऱ्यांना बजावले. यावेळी एसटी कर्मचारी संघटनेचे आबा भोंडवे, सचिन थोरात, सुरेश औटी, गणेश चौधरी, मच्छिंद्र शिंदे, उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यात चांगलंच चिघळले, राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत कर्मचारी आणि नागरिकांनाही सरकारवर दबाव वाढविण्याचा सल्ला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पैठणच्या सभेवरुन वरुण सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, म्हणाले…

Darrell Miranda

चांदाचे एकलव्य एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा चढवतील

News Desk

अखेर बीड अ‍ॅसिड हल्ला प्रकारणातील आरोपीला अटक

Gauri Tilekar