HW News Marathi
महाराष्ट्र

संग्राम जगताप यांच्या बॅनर्सवर राष्ट्रवादीचा उल्लेखही नाही

अहमदनगर | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील बड्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारे धक्के दिवसेंदिवस वाढतच आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अहमदनगरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार संग्राम जगताप हे देखील पक्षाची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. संग्राम जगताप यांनी लावलेल्या कोणत्याही बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचा साधा उल्लेख नसून घड्याळाचे चिन्ह देखील नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा रंगत आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी संग्राम जगताप यांच्या पक्षांतराच्या चर्चा देखील रंगत होत्या.

संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी देखील देण्यात आली होती. मात्र, भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, संग्राम जगताप हे येत्या विधानसभेच्या निमित्ताने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा देखील काहीच दिवसांपूर्वी रंगत होत्या. त्यातच आता संग्राम जगताप यांच्या कोणत्याही बॅनरवर हेतुपूर्वक टाळला राष्ट्रवादीचा उल्लेख चर्चेचे कारण ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालेगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा रस्ता रोको

News Desk

“बंद में कभी कभी ऐसा हो जाता है…” – संजय राऊत

News Desk

अँस्ट्राँसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

News Desk