HW News Marathi
महाराष्ट्र

हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, एथलेटिक्स खेळातही अपयश!

टोकियो। ओलिम्पिक्समध्ये आजचा (3 ऑगस्ट) 11 वा दिवस भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. कोणत्याच स्पर्धेत यश न मिळवता आलेल्या भारतीय संघाला उलट सुवर्णपदकाची सर्वाधिक आशा असणाऱ्या पुरुष हॉकी स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. हॉकी, एथलेटिक्ससह कुस्तीच्या मैदानातही भारतीयांनी आज नशीब आजमवलं पण सर्वत्र पदरी निराशाच पडली.

कांस्य पदक निश्चित केलं

आतापर्यंत भारताला दोन पदकं मिळाली असून तिसरं पदक निश्चित झालं आहे. यामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक मिळवलं आहे. तर दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरीत कांस्य पदक मिळवलं आहे. याशिवाय बॉक्सिंगमध्ये महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने सेमीफायनलमध्ये एंट्री मिळवत किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे. पण 11 व्या दिवशी भारताला काहीच खास कामगिरी करता आली नाही.

अयशस्वी ठरली

भारतला दिवसाच्या सुरुवातीच्या स्पर्धेतच निराशा मिळाली. महिलांच्या भाला फेक स्पर्धेच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये नॅशनल रेकॉर्ड होल्डर अन्नु रानी सहभागी झाली होती. ऑलिम्पिक पदार्पण करणारी रानी फायनलसाठी क्वॉलिफिकेशन करण्यात अयशस्वी ठरली. तीन प्रयत्नातील 54.04 मीटर हा तिचा बेस्ट थ्रो ठरला. ज्यामुळे 15 खेळाडूंमध्ये ती 14 वी आली. ज्यामुळे पुढील फेरीत जाण्यापासून हुकली.

भारतासाठी दिवसातील सर्वात महत्त्वाचा सामना असणाऱ्या पुरुष हॉकी संघाच्या सामन्यात भारताला बेल्जियमकडून 5-2 ने पराभव स्विकारावा लागला. तब्बल49 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या भारताच्या पदरी निराशा पडली. सामन्यात 49 व्या मिनिटापर्यंत भारत 2-2 च्या बरोबरीत होता. पण अखेरच्या 11 मिनिटात बेल्जियमने 3 गोल ठोकत भारताला पराभूत केल. आता भारतीय संघाकडे किमान कांस्य पदक मिळवण्याची संधी असून यासाठी 5 ऑगस्टच्या सामन्यात जर्मनीला पराभूत करणे गरजेचे आहे.

नियामांनुसार बाहेर करण्यात आलं

फ्रीस्टाइल कुस्तीमघ्ये भारताची 19 वर्षीय कुस्तीपटू सोनमने मलिक 62 किलोग्राम वजनी गटात सहभाग घेतला होता. तिचा पहिलाच सामना मंगोलियाच्या बोलोरतुया हिच्याशी झाला ज्यात सोनमने बराच वेळ 2-0 ची आघाडी ठेवली होती.पण नंतर प्रतिस्पर्धी खेळाडूने देखील बढत घेत 2-2 ची बरोबरी साधली. सोनमकडे रेपेचेजच्या मदतीने पुढे जाण्याची संधी होती. पण मंगोलियाची कुस्तीपटू फायनलमध्ये न पोहोचल्याने दोघींनाही स्पर्धेच्या नियामांनुसार बाहेर करण्यात आलं.

भारताची दिवसातील शेवटची स्पर्धा असणाऱ्या गोला फेकमध्ये भारताचा तजिंदरपाल सिंग तूर पात्रता फेरीत जागा मिळवू शकला नाही. स्पर्धेत त्याचा सर्वश्रेष्ठ थ्रो 19.99 मीटर इतकाच होता. क्वालिफिकेशनसाठी 21.20 मीटर लांबी किंवा अव्वल 12 मध्ये येणं आवश्यक होतं. सिंग 13 व्या स्थानावर राहिल्याने त्याचं पुढील फेरीत जाणं थोडक्यात राहिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही तर त्यापुढे जाऊन काम करतो – आदित्य ठाकरे 

News Desk

राज्यात नाईट कर्फ्यू लागणार? मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता, राजेश टोपेंची माहिती!

News Desk

भीमा कोरेगावमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू 

News Desk