HW News Marathi
देश / विदेश

देशाचे लॉकडाऊन २१ दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही, केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशभरात एकूण २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशातील या लॉकडाऊनसंदर्भात अनेक उलट-सुलट चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, खुद्द केंद्रानेच आता यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. “देशाचे लॉकडाऊन हे २१ दिवसांपेक्षा जास्त वाढणार नसून याबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही”, असे आता केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे देशातील २१ दिवसांचे लॉकडाऊन हे आणखी वाढणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र, अशी अफवा पसरविणारे सर्व अहवाल, बातम्या या तथ्यहीन असल्याचे आता केंद्रीय कॅबिनेट सचिवांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारने सुरू केले नवे व्यासपीठ 

News Desk

राहुल गांधींनी दाखवला फिटनेसचा दम, ९ सेंकदात १३ पुशअप्स!

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती अत्यंत नाजूक

News Desk