HW News Marathi
महाराष्ट्र

ज्ञानाचे कार्य करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने केली २ कोटी रुपयांची मदत

सातारा | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. कोरोना हे संपूर्ण मानवजातीवर आलेले संकट आहे. काल (२९ मार्च) बारामतीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. हा रुग्ण रिक्षाचालक असून अनेकांच्या सानिध्यात आल्याची शंका आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ हवी ती मदत प्रशासन करेल असे आश्वासन दिले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आणून देत आहेत.

कोरोना हे जगावर आलेले जागतिक संकट आहे आणि त्यामूळे देशाच्या, राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडणार आहे किंबहूना पडत आहे. दरम्यान, सरकार या जागतिक महामारीचा सामना मोठ्या धैर्याने करत आहे. तसेच, या कोरोनाला रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या प्रसंगी अनेक दिग्गज पुढे येत सरकारची सर्वतोपरी मदत करत आहेत. यालाच हातभार हा ज्ञानाचे काम करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेनेही केला आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी म्हणजे २ कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-१९ मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. या संदर्भातील ट्विट करत त्यांनी पत्रही पोस्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वरुण सरदेसाई आता आला, तर माघारी जाणार नाही” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ईशारा!

News Desk

नाशिक महापालिकेने वाहिली गायीला श्रद्धाजंली

News Desk

“ येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका”, नितेश राणेंचा खोचक सल्ला

News Desk