HW News Marathi
देश / विदेश

“…उशीरा का होईना शहाणपण आलं!”, पवारांची मोदींवर टीका

मुंबई | “या कायद्यांची किंमत मोजावी लागेल. यामुळेच हे कायदे रद्द करण्यात आले. उशीरा का होईना शहाणपण आले,” असा उपासात्मक टीका राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “त्याबद्दल मी दुःख व्यक्त करत नाही. एक वर्षापासून आपल्या प्रश्नांसाठी शांततेच्या मार्गाने संघर्ष करणाऱ्या संबंध शेतकरी वर्गाला मी यानिमित्ताने सलाम करतो,” असे पवार म्हणालं. शरद पवार हे विदर्भ दौऱ्या दरम्यान आज (१९ नोव्हेंबर) चंद्रपूरमध्ये बोलत होते.

“या कायद्यांची किंमत मोजावी लागेल, यामुळेच हे कायदे रद्द करण्यात आले. उशीरा का होईना शहाणपण आले. त्याबद्दल मी दुःख व्यक्त करत नाही. एक वर्षापासून आपल्या प्रश्नांसाठी शांततेच्या मार्गाने संघर्ष करणाऱ्या संबंध शेतकरी वर्गाला मी यानिमित्ताने सलाम करतो,” असे म्हटलं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदे रद्द

यावेळी पवार म्हटलं, “एक गोष्ट चांगली झाली की, या आंदोलनात जो संघर्ष झाला त्यात उत्तर प्रदेशमधील काही भाग, पंजाब आणि हरयाणा मधील शेतकरी उतरले. आता पंजाब आणि उत्तर प्रदेश याठिकाणी निवडणुका आल्या आहेत. निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधी मत मागायला गेल्यानंतर लोक कायद्यांबद्दल विचारतील,” या भितीने सरकारनं हे कायदे रद्द केल्याचं मत पवारांनी व्यक्त केले आहे.

चर्चा न करता कायद मंजूर केले

मी स्वतः कृषिमंत्री म्हणून देशातील सर्व राज्यांच्या कृषी, पणन, सहकार खात्याच्या मंत्र्यांच्या बैठका घेतल्या आणि याची चर्चा केली. त्यानंतर सरकार बदलले आणि मोदी सरकारने तीन कायदे एकदम सरकारमध्ये आणले. त्याची पूर्ण चर्चा ही राज्यांसोबत करणे किंवा संसदेच्या सदस्यांसोबत करणे, शेतकरी सदस्यांसोबत करणे ही प्रक्रिया झाली नाही. अक्षरशः काही तासात हे तीनही कायदे केंद्र सरकारने मंजूर करून टाकले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टोक्यो पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन!

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

Gauri Tilekar

केंद्र सरकार आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्या बैठकीत तोडगा नाहीच!

News Desk