HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

“हा देश फक्त ४ लोक चालवतात, हम दो हमारे दो !”, राहुल गांधी आक्रमक

मुंबई | देशात सध्या मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांचा मुद्दा जोरदार गाजत असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. असे असताना आज (११ फेब्रुवारी) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “हा देश फक्त ४ लोक चालवतात. हम दो हमारे दो !”, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी यावेळी राहुल गांधी बोलत असताना भाजप खासदारांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ घातला.

मोदी सरकारला सुनावताना यावेळी राहुल गांधी म्हणाले कि, “काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आला होती. आता जसा कोरोना आपल्या नव्या रूपात आला आहे त्याचप्रमाणे ही घोषणा देखील नव्या रुपात आली आहे. हा देश फक्त ४ लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’”, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. “नरेंद्र मोदी त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणं हाच आहे. आपण सर्वसामान्यांना भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे तीन पर्याय दिले आहेत”, असा घणाघातही राहुल गांधींनी यावेळी केला.

तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील !

राहुल गांधी यावेळी म्हणाले कि, “आज आपला देश रोजगार निर्मिती करु शकत नाही. उद्याही रोजगार येणार नाहीत कारण सरकारने छोटे उद्योग, व्यापारी, मजूर, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. हे शेतकऱ्यांचं नाही तर देशाचं आंदोलन आहे. शेतकरी अंधारात बॅटरी दाखवत आहेत. देश ‘हम दो हमारे दो’ विरोधात उठणार आहे”, असा इशारा राहुल गांधींनी दिले आहे. त्याचप्रमाणे, “देशातील शेतकरी, मजूर आणि छोट्या दुकानदारांना तुम्ही त्यांच्या पैशांपासून दूर करु शकाल असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला लिहून देतो की शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील.”

Related posts

अजित पवार मुख्यमंत्र्यांना जरा सांगा ….निलेश राणेंनी काय मागणी केली ?

News Desk

राफेल विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली, याचा अर्थ ती खरी होती !

News Desk

मरकजवाल्यांना गोळ्या घालुन ठार मारलं पाहिजे,राज ठाकरे कडाडले !

News Desk