HW News Marathi
महाराष्ट्र

ऑपरेशन क्लिनअप – भाग २ सुरू ! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ‘ऍक्शन मोड’मध्ये

मुंबई | मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे आता चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. कारण, राज्याच्या पोलिस विभागात पुन्हा मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या आहेत. हेमंत नगराळे यांनी गुन्हे शाखेत ५ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या तब्बल ६५ हून अधिक अधिकाऱ्यांना थेट बाहेरचा मार्ग दाखविला आहे. त्याचसोबत ईओडब्ल्यू विभागातही अशीच कारवाई करण्याचा निर्णय हेमंत नगराळे यांनी घेतला आहे. शहरातील भ्रष्टाचारी पोलिसांना हटवण्याचे काम सध्या हेमंत नागराळे यांनी हाती घेतले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कशी याबाबत बोलताना मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, “हे ऑपरेशन क्लीन-अपचा भाग २ आहे”. दरम्यान एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार; दिलीप देशमुख, जितेंद्र मिसाळ, विनोद भालेराव, बळीराम धस, कुंडलिक गढवे, किरण जाधव, चंद्रशेखर गायकवाड, विक्रांत शिरसाठ, संदीप बडगुजर, दीपक कदम, प्रवीण फणसे, महेश तांबे आणि धनंजय देवदेकर यांची बदली झाली आहे. त्याचप्रमाणे, या सर्व अधिकाऱ्यांना नवीन पोस्टिंगसाठी त्वरित अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

साधारणतः एका पोलीस पदावर ३ वर्ष काम केल्यानंतर दुसर्‍या पदावर बदली करण्याचे नियम आहेत. मात्र, ईओडब्ल्यू सूत्रांचे म्हणणे आहे की, काही अधिकारी ६ वर्षाहून अधिक काळ या विभागात कार्यरत आहेत आणि त्यांच्या बदलीदरम्यानही त्यांची नेमणूक याच विभागात केली जाते. मात्र, आता अशा सर्व अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिस स्टेशन किंवा साईड ब्रँचसारख्या अन्य पोलिस विभागात हलविण्यात येणार आहे.

सचिन वाझेच्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिस दलाची मानहानी झाली आहे. इतकेच नव्हे तर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांच्या माध्यमातून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता.

मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर, विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले असतानाच हेमंत नगराळे यांना मुंबई पोलिस आयुक्त बनविण्यात आले आहे. त्यामुळे, आता नगराळे यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे की, या कठीण आणि संशयास्पद स्थितीतून मुंबई पोलिसांना बाहेर काढणे. सद्यस्थितीत हेमंत नगराळे ज्या पद्धतीने पाऊल उचलत आहेत त्यावरून मुंबई पोलिसांची प्रतिमा दुरुस्त करण्यासाठी आपण काय करू शकतो? याकडे त्यांचे विशेष लक्ष आणि हाच त्यांचा मुख्य हेतू आहे हे स्पष्ट होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ वर

News Desk

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले….

News Desk

संभाजी राजांबद्दल वादग्रस्त लिखाण, प्रकाशकांनी मागितली माफी

Gauri Tilekar