HW News Marathi
महाराष्ट्र

“कोशीश करने वालों की कभी हार नही होती,” अँजिओप्लास्टीनंतर राऊतांचे ट्विट

मुंबई। “कोशीश करने वालों की कभी हार नही होती,” असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लिलावती रुग्णालयातून केले आहे. राऊतांववर काल (११ नोव्हेंबर) अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. राऊतांवर डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. काल राऊतांच्या छतीत दुखू लागल्याने ते रुग्णालायता दाखल झाले. यानंतर तपासणीमध्ये राऊतांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये २ ब्लॉक होते.

सध्या राऊतांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयातून देखील ते राजकीय त्यांनी ट्विट करत बॅटींग करत आहे. राऊत म्हणाले की, “”लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’ बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…”, असे ट्विट केले आहे. राऊत गेल्या २० दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. रुग्णालयात असताना राऊत पत्रकार परिषदे घेणे जणून दिनक्रम झाला होता. मात्र, पत्रकार परिषद जरी नाही घेतली नसली तरी त्यांची राजकीय भूमिका मांडणार असल्याचे हे आज (१२ नोव्हेंबर ) त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे.

अत्यंत आक्रमकपणे राऊतांनी शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. यासाठी शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. काल देखील वांद्रे येथील हॉटेल ताज लँड येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत उपस्थित होते. मात्र, अचानक छातीत दुखू लागल्याने ते रुग्णालयात गेले. या बैठकीनंतर शरद पवार वाय बी चव्हाण सेंटर तर उद्धव ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘असे क्षण महत्त्वाचे असतात’, राणे परिवार दिल्लीत दाखल..!

Ruchita Chowdhary

मुंबईच्या पावसाचे दोन बळी, तिघे बेपत्ता

News Desk

नवनीत राणांनी खासदारकींचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहावं!

News Desk