HW News Marathi
महाराष्ट्र

उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू

बीड | जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भतानवाडीमध्ये गावात हिटरचे उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. तर यात एक महिलाही गंभीर भाजली आहे. सकाळी पाणी गरम करण्यासाठी ठेवले असता अचानक वीज गेली ज्यामुळे सकाळी सुरु केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटण तसेच सुरु राहीले.

मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हिटर सुरु झाला त्यातच हिटरच्या स्टुल खालचा आधार सरकला आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. उकळते पाणी अंगावर सांडल्याने मुलींचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मुलींची मामी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हल्ली महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्यं; अजित पवारांची पंतप्रधानांकडे तक्रार

Aprna

मुख्यमंत्र्यांचे अपघातग्रस्त हेलीकाॅप्टर चाैकशी समितीने मध्यरात्री मुंबईकडे रवाना

News Desk

‘भाजपकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा’!

News Desk
राजकारण

चले जाओ मोदी

News Desk

छत्तीसगड | नरेंद्र मोदींच्या छत्तीसगढ दौऱ्याआधीच स्थानिक एनएसयूआई कार्यकर्त्यांनी भिलाईच्या रस्त्यांवर ‘गो बॅक मोदी’ असे नारे लिहले आहेत. पंतप्रधान आज भिलाई स्टील प्लांटच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्याबरोबरच ते जगदलपूर हवाई अड्ड्याचे उद्घाटनही करणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढता बेरोजगार, असुरक्षित कन्या महाविद्यालये, शिक्षणाचा दर्जा कमी करणे, शिक्षणात वाढत्या भ्रष्टाचार आणि गंभीर स्वरूपातील वाढत्या संघटनांच्या विरोधात एनएसयूआई कार्यकर्त्यांनी मोदींना येण्यास विरोध केल्याचे बोलले जात आहे. दुपारच्या सुमारास मोदी भिलाई येथे दाखल होणार आहेत. त्याआधीच कार्यक्रमाच्या परिसरातील रस्त्यांवर ‘गो बॅक मोदी’ असे लिहिण्यात आले आहे.

Related posts

“…चुकीचे परिणाम राजाला नाही राज्याला असतात”, उद्धव ठाकरेंचा NIT घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला

Aprna

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk