HW News Marathi
देश / विदेश

येत्या ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड ‘आधार’शी लिंक करणे बंधनकारक

मुंबई | देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता नागरिकांना येत्या ३१ मार्चपर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणे बंधनकारक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. हि मुदत वाढविण्यात आल्यानंतर २७ जानेवारी २०२० पर्यंत तब्बल ३० कोटी ७५ लाख नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले आहे. मात्र, अद्याप १७ कोटी ८५ लाख नागरिकांनी अजूनही आपले पॅन कार्ड आधारकार्डसोबत लिंक केलेले नाही. त्यामुळे, त्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येणे शक्य आहे.

तुमचे पॅन कार्ड ‘आधार’सोबत लिंक करण्याची प्रक्रिया काय ?

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आयकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन वेबसाईटवरील ‘लिंक आधार’ हा पर्याय निवडा. रजिस्ट्रेशन करून वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर ‘प्रोफाईल सेटिंग’मध्ये जाऊन ‘लिंक आधार कार्ड’चा पर्याय निवडा. त्यानंतर तिथे तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कोड टाका. ही माहिती भरल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारही लिंक होईल. त्याचप्रमाणे, ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस करुन देखील तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शैक्षणिक संस्थांनामध्ये हिजाब बंदी योग्यच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

swarit

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ | ट्रम्प

News Desk