HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

राज्यात आजही नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांहून अधिक

मुंबई । शासन आणि प्रशासनासाठी राज्यातील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढता आकडा हा चिंतेचा विषय ठरत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२५ फेब्रुवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ७०२ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ३ हजार ७४४ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आता २० लाख १२ हजार ३६७ इतका झाला आहे.

राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून शासन-प्रशासनासह नागरिकांनी देखील याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन झाले तरच पुन्हा एकदा ही स्थिती नियंत्रणात आणणे शक्य होणार असल्याने नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. दरम्यान, सद्यस्थितीत राज्यात एकूण ६४ हजार २६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.४९% झाले आहे.

Related posts

जिल्ह्याच्या बाहेरही बस सेवा होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, कोरोनापासून वाचायचे असल्यास मास्क बंधनकारक

News Desk

CBSE चा १०वीचा निकाल आज जाहीर होणार !

News Desk