HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात दारू महागणार, उत्पादन शुल्कात वाढ – अजित पवार

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज (८ मार्च) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात तळीरामांच्या खिश्याला आता चांगलीच कात्री लागणार आहे. परदेशी आणि देशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी सामना करत असताना अनेक उद्योग धंदे बंद होते. त्याामुळे आलेली तूट प्रमुखपणे मांडत आगामी वर्षात महसुलीत वाढ करण्याच्या उद्दीष्ट ठेवून अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.

राज्य उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशी मद्याचे दोन ब्रँड असून नॉन ब्रँड आणि ब्रँडेड असे निश्चित करण्यात येणार आहे. निर्मिती मुल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रतिलिटर प्रस्तावीत करण्यात येणार आहे त्यामुळे अंदाजे ८०० कोटी महसूल मिळण्याची शक्यता आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहेमद्यावरील मूल्यवर्धित करामध्येही वाढ करण्यात आली असून, ६० टक्क्यावरून ६५ टक्के करण्याचा प्रस्ताव. १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार. मात्र, यामुळे राज्यात दारू महागणार आहे.

* दारुच्या किमती वाढणार, व्हॅटमध्ये ५% वाढ

  • मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये वाढ
  • मद्यावरील व्हॅटमध्ये ६० वरुन ६५% वाढ
  • महाराष्ट्रात दारुच्या किमती वाढणार
  • देशी बनावटीच्या मद्याच्या उत्पादन शुल्कात निर्मिती मूल्याच्या २२०% किंवा १८७ रुपये राहणार
  • सर्व प्रकारच्या मद्यावरील व्ह्रॅटचा दर ३५% वरुन ४०%
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘… अन्यथा ठाकरे सरकार पडेल!’ अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk

सोमय्यांनी कागदपत्रं दिल्यास उद्धव ठाकरेंची चौकशी होणार – मुख्यमंत्री

News Desk

पांडुरंगाच्या ” रिंगण ” सोहळ्यासाठी एस.टी.च्या जादा बसेस

News Desk