HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विक्रमी सभांमुळे महाराष्ट्रात तुफान

मुंबई | राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रे दरम्यान काँग्रेस नेत्यांच्या दणदणीत भाषण, संयम व नेतृत्वामुळे सध्या वातावरण ढवळून निघालेच आहे शिवाय राष्ट्रवादीच्या विक्रमी सभांमुळे एक तुफान आल्याचे चित्र गेले १२ दिवस पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळाले.

विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर हल्लाबोल केला त्यानंतर चौथा टप्पा २ ते १२ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात झाला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळाला परंतु विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात झालेल्या सभेने आजपर्यंतचे सर्वांचेच रेकॉर्ड मोडल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेवून पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोलची सुरुवात झाली. कोल्हापूरपासून सुरु झालेल्या हल्लाबोल आंदोलनातील शेवटची सभा पुण्याच्या वडगांवशेरी-खराडी येथे झाली.अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे,जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील, चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत सरकार आणि सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व सेलचे अध्यक्ष, आमदार यांनीही भाजप-सेनेच्या कारभारावर हल्ला केला. एकंदरीतच राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांसह सर्वच नेत्यांनी हल्लाबोल आंदोलनामध्ये सरकारविरोधात आक्रमकता दाखवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जिहादी दहशतवादाशी निघडीत विचारलेल्या प्रश्नामुळे सावित्रिबाई फुले विद्यापीठ अडचणीत

News Desk

जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिली पोलिसांना क्लीन चिट

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब घेणार पुन्हा बैठक!

News Desk
राजकारण

राम मंदिर बांधण्यातील अडथळा नरेंद्र मोदीच | प्रवीण तोगडिया 

News Desk

नागपूर ।”अयोध्येत राम मंदिर बनवण्यामध्ये येणारा अडथळा नरेंद्र मोदीच आहेत,” असे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले आहेत. रविवारी (७ ऑक्टोबर ) संघभूमीत येऊन तोगडियांनी राष्ट्रीय स्वयंम संघ व नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र चालवले आहे. संघावर दबाव असल्यामुळे कुणीही राम मंदिराबाबत पुढाकार घेतला नाही. “माझ्यावर सुद्धा दबाब टाकण्यात येत आहे,” अशा प्रकारचा आरोप तोगडिया यांनी मोदींवर केला.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडून २१ ऑक्टोबरला लखनौ ते अयोध्येपर्यंत शांतिपूर्व यात्रा काढण्यात येणार आहे. देशातून वेगवेगळ्या भागातून रामभक्त या यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रवीण तोगडिया या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. “३२ वर्षांपासून संसदेत कायदा तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु वारंवार आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. सत्तेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघच महत्त्वाची भूमिका आहे. तरीही राम मंदिराबाबत निर्णय घेता येत नाही. संघाने लवकरात लवकर संसदेत कायदा तयार करण्याचे आदेश द्यावे”, असे ही तोगडिया यांनी सांगितले आहे.

प्रवीण तोगडियांनी म्हणाले की, “शिवसेनेचे आम्ही समर्थन करू तसेच शिवसेनेवर हिंदूंनाही पूर्ण विश्वास आहे. पक्षप्रमुखांनी राम मंदिर उभारण्या बाबत ठोस भूमिका घ्यावी अयोध्येकडे कूच करावे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे.”

Related posts

राहुल बाबा तुम्हाला आकडेवारी येत नाही ?

News Desk

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही! – शरद पवार

Aprna

आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच !

News Desk