HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील पर्यटनस्थळे पुर्ण क्षमतेने सुरु, हॉटेल ११ पर्यंत सुरु राहणार, अजित पवारांची घोषणा!

मुंबई। कोरोना काळात मागील दीड वर्षांनी बंद असलेले ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यनट स्थळे येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच पुण्यातील हॉटेल सध्या १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी होती ती वाढवून रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. महाविद्यालयांना सुरु करण्याची परावानगी देण्यात आली आहे परंतु फक्त दोन लसींचा डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची जबाबदारी संस्थेवर आणि महाविद्यालयावर असेल असे अजितत पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली आहे. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करुन काही सुविधांना परवानगी देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. पुण्यातील पर्यटन स्थळे सुरु करण्याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच राज्यभरात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. पुण्यातही महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी सूचना अजित पवार यांनी दिली आहे. त्या त्या संस्थेवर विद्यार्थ्यांची जाबाबदरी असेल असेही अजित पवारांनी म्हटलं आहे.पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सिनेमागृह आणि नाट्यगृह हे २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पुढील आठवड्यातील आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. या आठवड्यातील कोरोना परिस्थितीचा पुढील आठवड्यात आढावा घेण्यात येईल यामध्ये कोरोना लसीकरण, कोरोना प्रादुर्भाव आणि कोरोना टक्केवारी यावरुन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्रात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या स्थानी मुंबई आणि दुसऱ्या क्रमांकावर पुणे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. पुण्यात एकूण १ कोटींच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाडमधील पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुटका करण्याची सुरुवात….!

News Desk

आर्यभट्टांनी शोध लावलेल्या शुन्याचा वापर भाजपाने जास्त केला

swarit

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सरकारने कसली कंबर!

News Desk