लोणावळा | मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटातील ठाकुवाडी ते मंक्की हिलदरम्यान आज (८ जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याने मिडल व डाऊन लेन बंद ठप्प झाली आहे. यामुळे पुण्याकडे येणार्या सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. ठाकुवाडी ते मंक्की हिलदरम्यान रेल्वे किमी ११५ जवळ ही घटना घडली आहे. लोणावळा आणि खंडाळा परिसरात आज दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
Maharashtra: Train movement on Mumbai-Pune line on Central Railway route affected after a boulder fell on the down line between Thakurwadi-Monkey Hill at 1515 hours. Down line and Middle line affected.
— ANI (@ANI) July 8, 2019
पावसामुळे मंक्की हिलजवळ लहान स्वरुपाची दरड कोसळली. माती व दगड बाजुला करुन दोन गाड्या सोडल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड मिडल लाईनवर कोसळली. यावेळी काही दगड डाऊन लाईनवर गेल्याने या दोन्ही लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मार्गावर आलेले दगड मोठे असल्याने ते ब्लास्ट करुन फोडण्याचे काम सुरू असून यानंतर रेल्वे सेवा सुरू होणार आहे. यामुळे पुण्याकडे सर्व रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत..
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.