HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस; एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्नेंची माहिती

मुंबई | दिवाळी (Diwali) आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चन्ने यांनी केले आहे.

 

दरम्यान, एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले आहे.

 

दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.  सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, असे श्री.चन्ने यांनी सांगितले. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असेही चन्ने यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला – संजय राऊत

News Desk

काकांच्या पावलावर रोहीत पवारांचे पाऊल, ४ वाजताच APMC पोहोचले मार्केटमध्ये

News Desk

एसटीचा संप चिघळण्याची शक्यता – कामावर रूजू व्हा नाही तर निलंबन 

News Desk