HW News Marathi
महाराष्ट्र

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; पश्चिम आणि हार्बर मात्र सुरळीत

मुंबई | मुंबईत शनिवार संध्याकाळ पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर २० मिनिटे उशिराने लोकल धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे रेल सेवा ठप्प पडल्या आहेत. संपूर्ण रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरून रेल्वे धीम्यागतीने सुरू होती.

पश्चिम आणि हार्बर सेवा सुरळीत सुरु

मुंबईत पाऊस पडून रेल सेवा बंद होणं हे काही नवीन नाही. विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचलं होतं. त्यामुळे २० मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. फक्त मध्य रेल्वे २० मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

वाहतूक विस्खलित

पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी साचलं असून वाहतूक विस्खलित झाल्याचं दिसून येतंय. अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्येही पाणी साचलं आहे. मुंबईतील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

मुसळधार पावसाने मुंबईत पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला

मुसळधार पावसाने मुंबईतील पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात पाणी भरल्यामुळे त्याचा परिणाम फिल्टर प्लांटवर झाला आहे. हवाई विद्युत पुरवठा बंद केला आहे. हे निराकरण करण्यास वेळ लागेल. यामुळे आज मुंबईतील बर्‍याच भागात पाणीपुरवठा ठप्प होईल. मालाड, कांदिवली, बोरिवली येथे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद आहे. तसेच कुलाबा, वांद्रे आणि मुंबई मध्यवर्ती ठिकाणी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा केला जात नाही. पावसाच्या पाण्यामुळे आजारांच्या आजाराची भीती पाहता बीएमसीने लोकांना पाणी उकळवून ते पिण्यास सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही!’ सदा सरवणकरांचं मोठं विधान

News Desk

माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद

swarit

मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार, रावसाहेब दानवे म्हणाले…

News Desk