HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीच्या नोटीसी नंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया!

मुंबई। ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स पाठवन्यात करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यादरम्यान अनिल परब यांनी संध्याकाळी प्रतिक्रिया दिली.

नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ

आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?

“काल रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली. त्या जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत. जनआशीर्वाद यात्रा संपली आणि ताबडतोब या पालकमंत्र्यांना वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं. ईडीचं. येऊ द्या. कायदेशीर लढाई आहे. आम्ही काय कुणाला धमक्या देणार नाही. आम्ही नॉर्मल माणसं आहोत. नॉर्मल माणसं कायदेशीर लढाया लढतात आणि जे असत्य आहे, जे बनावट आहे त्याचा पर्दाफाश करतात. आमच्या लढाईला नैतिकतेचं बळ आहे. आम्ही बनावट नाही. तुम्ही हे सर्व आमच्यावर लादत आहात,” असं रोखठोक भाष्य राऊत यांनी केलंय.

अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या! – अजित पवार

Aprna

गोव्यात आघाडी सरकारची उभारणी करण्यासाठी शरद पवारांना मध्यस्थीसाठी विचारणार – दीपक केसकर

News Desk

पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी  

News Desk