HW News Marathi
महाराष्ट्र

आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला

पोलादपूर | नववर्षाच्या सुरुवातीलाच आंबेनळी घाटात खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी (२ जानेवारी) सकाळी ही घटना घडली असून चालक आणि सहप्रवासी ट्रकमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रकला बावळी गावाच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा ट्रक सुमारे ६० पेक्षा जास्त फूट खोल दरीत कोसळला. या घटनेमध्ये जिवितहानी झाली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

ट्रक सकाळी जॉन्सन कंपनीच्या टाईल्स व पाण्याचा बाटल्या घेऊन पोलादपुरवरून साताऱ्याकडे जात होता. पोलादपूर हद्दीतील बावळी गावाजवळ चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलादपूर आणि महाबळेश्वर येथील ट्रेकर्ससह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. गतवर्षी याच ठिकाणी महाराष्ट्राला हादरून टाकणारी दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला झालेल्या अपघाताची आठवण ताजी झाली. या अपघातात बसमधील ३३ जण ठार झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारा मी नाही’, भाजपकडून हसन मुश्रीफांना चोख उत्तर

News Desk

राष्ट्रवादीमुळे सत्तेची संधी गेलीः पृथ्वीराज चव्हाण

News Desk

Kulbhushan Jadhav Verdict । १ रुपया वेतनात हरीश साळवे यांनी लढविला खटला

News Desk