HW News Marathi
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडेंची मेट्रो – ३ प्रकल्पातून उचलबांगडी

मुंबई | ठाकरे सरकारने काल (२१ जानेवारी) २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात बहुचर्चित सनदी अधिकारी तुकाराम मुंढे मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिंडे यांचा समावेश आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले तुकाराम मुंडे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. यापूर्वी नाशिकचे महापौर आणि पीएमपीएलचे आयुक्त म्हणून काम करत होते. तर मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रणजीतसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, भिडे यांना मात्र अद्याप कोणतीही नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळा तुकाराम मुंढे यांची नियुक्ती नाशिक एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. आता ठाकरे सरकारने भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांना नेमले आहे. येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ठाकरे सरकारने बढती दिली होती. भिडेंना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांना आरे मेट्रो-३च्या कारशेडच्या मुद्द्यावरून वाद राहिल्या होत्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, ठाकरे सरकारने भिडेंना पदोन्नती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते”, गोपीचंद पडळकरांचे जितेंद्र आव्हाडांवर टीका

Aprna

स्मृती इराणी विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार

News Desk

“अजित पवारांसोबत आम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी ठाकरे सरकारने लावलेली ताकद आता कुठे गेली?”

News Desk