HW News Marathi
महाराष्ट्र

रूपाली चाकणकर अमृता फडणवीसांना म्हणाल्या ,सर्कस की शेरनी !

मुंबई | राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या मध्ये पुन्हा एकदा ट्विट वॉर सूरु झाले आहे. राजकीय शेरेबाजीमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या अमृता फडणवीस यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपण टीकाकारांची फारशी पर्वा करत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही एक खोचक ट्विट करून अमृता फडणवीस यांना टोला लगावला. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटवर वॉर रंगले आहे.

काय होते अमृता फडणवीस यांचे ट्विट?

जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती !, अमृता फडणवीस यांनी याआधी देखिल अनेक वेळा सरकारला किंवा सरकारमधील नेत्यांना टोकले आहे. त्यांच्या ट्विटवर रूपाली चाकणकर यांनी मात्र त्यांना चांगलचं सुनावलं आहे.

काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

जंगल की शेरनी शिकार करती है…सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन ! अशा खरमरीत शब्दांत त्यांनी टीका केली आहे. यापूर्वी देखील या दोघींमध्ये असेच ट्विट वॉर रंगलेले पाहायला मिळाले होते.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही मंगळवारी अमृता फडणवीस यांना लक्ष्य केले होते. राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे संकट ओढावले असताना अमृता फडणवीस संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली होती.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

मुंबईत सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचे थैमान सुरु असताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna

अजूनही लस हाती आली नाही, या दौऱ्यात काय होणार नक्की माहित नाही, मोदींच्या पुणे दौऱ्यावर मुख्यमंत्र्याचे उत्तर

News Desk

“चंद्रकांतदादा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी”, अजित पवारांनी लगावला टोला

News Desk