HW News Marathi
देश / विदेश

ट्विटर कडून राहुल गांधींवर कारवाई !

नवी दिल्ली। ट्विटर कडून राहुल गांधींचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं लॉक केलं होतं. राहुल गांधी यांनी ट्विटरला दिल्लीमधील नऊ वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती.

राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद

राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबियां सोबत फोटो ट्विट केला होता. या फोटो वरून सगळ्यांनी आक्षेप देखील घेलता होता. ट्विटरने राहुल गांधींचं अकाउंट बंद केल्या नंतर काँग्रेसने ती माहिती ट्विटर द्वारे दिली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. “राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद करण्यात आलं असून ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती काँग्रेसकडून ट्वीट करत देण्यात आली. तोपर्यंत राहुल गांधी इतर माध्यमातून तुमच्या संपर्कात राहतील आणि लोकांसाठी आपला आवाज उठवत राहतील असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

भाजपने केली तक्रार

राहुल गांधी यांच्या ट्विटची तक्रार भाजपने केली असा आरोप काँग्रेस पक्षाने लावला आहे. “भाजपाने केलेल्या तक्रारीच्या आधारे राहुल गांधींचं ट्विटर खातं लॉक करण्यात आलं आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय देण्याऐवजी भाजपा आणि मोदी सरकार ट्विटरला भीती दाखवण्यात व्यस्त असून राहुल गांधींचाही बेकायदेशीरपणे पाठलाग करत आहे. त्यांनी याच वेळेचा वापर पीडितेला न्याय देण्यासाठी केला असता तर दिल्ली आज एक सुरक्षित ठिकाण असतं,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.

काय आहे ट्विट?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज(४ ऑगस्ट) सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्ली छावणी परिसरातील पीडितेच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी आईवडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी याबद्दल माहिती दिली. “मी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांना न्याय हवाय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांची मदत करायला हवी. आम्ही मदत करू. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की, न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेल”, असं राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार

News Desk

ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार!

Jui Jadhav

सोमवारपासून जम्मू-काश्मीरमधील काही निर्बंध होणार शिथिल

News Desk