HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यात दोन नक्षलवादी ठार

मुंबई | महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील सुरक्षा दलाबरोबर झालेल्या एका चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमक आज (१९ नोव्हेंबर)ला सकाळी साडे आठच्या सुमारास धोराना तालुक्यातील निहायकाल जंगलाात झाली. पोलिसांच्या अल्ट्रा आणि सी-६० पथकातील कमांडोजनी ही कामगिरी केल्याचे गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती दिली.

 

सुरक्षा दलाने रविवारी रात्रीपासून नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली होती. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केल्यानंतर जवळपास अर्धा तास दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता. त्यानंतर शोध मोहिमेत दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आल्याचे पंडित यांनी सांगितले.

छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी नक्षलवादी हल्ले करण्यात आले आहेत. कांकरेच्या कोयली बेडा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्ब ब्लॉस्टमध्ये बीएसएफचा एक अधिकारी जखमी झाले होते. नक्षलवाद्यांनी असे ईआयडी असे ६ ब्लॉस्ट केले. यानंतर बीएसएफ आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये,काँग्रेसचा इशारा !

News Desk

बाबुवाडी सिंचन तलावाच्या प्रकल्पग्रस्तांना तातडीने जमिनीचा मोबदला द्या – राम शिंदे

News Desk

मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्या वाढवा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रातून आवाहन

News Desk
राजकारण

हिवाळी अधिवेशन सुरू, सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज

News Desk

मुंबई | विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता यंदाचे हिवाळी अधिवेशनासाठी अवघे आठ दिवस कामकाज होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ,अवनी वाघिणीच्या हत्या, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

आतापर्यंतच्या अधिवेशनाची आकडेवारी पाहिली तर, आघाडी सरकारच्या काळात अधिवेशनाचे दिवस कमी असल्याचे दिसून येतात. परंतु सरासरी तीनशे तास कामकाज झाल्याचे देखील दिसून आले आहे. तर युती सरकारच्या काळात एकाही वर्षी ३०० तास कामकाज झालेले नाही. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल ५५ वर्षांनी मुंबईत होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेतले जात होते. परंतु भाजप सरकारने यंदाचे हिवाळी अधिवेसन मुंबईत घेण्याच निर्णय घेताल आहे.

 

Related posts

INX Media Case: पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगामध्ये नाही

News Desk

“‘मविआ’चा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही”, ठाकरेंचा आंबेडकरांना सल्ला

Aprna

शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणजे जीवा शिवाची जोडी

News Desk