HW News Marathi
महाराष्ट्र

रत्नागिरी अन् वाशीममध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ही, दिल्लीच्या मरकजमध्ये होते सहभागी

मुंबई | दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता. या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यात मिळाली आहे. देशातील इतर राज्यात तबलिगी समाजातील लोकांना शोधून त्यांची तपासणी केली जात आहे. यातील काही जण महाराष्ट्रात अढळून आले आहे. यात रत्नागिरी कोरोनाचा दुसरा रुग्ण तर वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण अढळून आला आहे. हे दोघेही दिल्लीतील मरकजमध्ये गेल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या देशात २३०१ कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तर दुसऱ्या बाजुला मरकजला गेलेल्या तबलिगी समाजामुळे ६४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ४२३ वर पोहोचली असून दिल्लीच्या मरकजमध्ये केलेल्या दोन रुग्ण राज्यात आढळून आले आहे. यात वाशिममध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ही तर रत्नागिरीत दुसरा कोरोना रुग्ण आढळून आला आहे. रत्नागिरीतील पहिला कोरोना रुग्ण बरा होत असताना आता कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आपल्या मालकाला खूश करण्यासाठी हे करतात”, आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात…!

News Desk

मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अकृषिक करास तात्पुरती स्थगिती! – बाळासाहेब थोरात

Aprna

स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा !

News Desk