HW News Marathi
Uncategorized

केंद्रीय सुरक्षा बलाच्या ६ जवानांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

नवी मुंबई | कोरोनाचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतू, एक धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथे नियुक्त असलेल्या १३९ अधिकारी आणि सेवेसाठी असलेल्या १२ जणांपैकी ५ जवानांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता आता त्यात भर म्हणून आणखी ६ जणांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल (२ एप्रिल) रात्री उशिरा १४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळंबोलीती महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर तात्काळ या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली असता यापैकी ६ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले आहे. दरम्यान, केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठवल्याने त्यांवरील धोका काही अंशी टळला आहे. त्यांच्यासाठी एसजीएम रुग्णालयात वेगळ्या विंगमध्ये हा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. ज्यात त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेतील अन्न खरंच खाण्यायोग नाही

News Desk

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

Adil

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk