HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंहांच्या दोन पोलीस निरीक्षकांना CID कडून अटक

मुंबई। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दोन पोलीस निरीक्षकांना राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळ आणि आशा कोरड यांना काल (८ नोव्हेंबर) सीआयडीकडून अटक केले असून या दोघांना आज (९ नोव्हेंबर) न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. परमबीर सिंह यांनी आयुक्त पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे.
परमबीर सिंह यांनी कुख्यात गुंड छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिलाचा आरोपाखाली भाईंदर येथे बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर सिंह यांनी दिली होती. त्याबरोबर पुतण्याची खोटी स्वाक्षरी घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली. याच प्रकरणात खोटी स्वाक्षरी घेऊन खोटे दस्तावेज बनविण्यात आले होते. या प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितील. या प्रकरणात कोरके आणि गोपाळे यादोखांना अटक करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

News Desk

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं!

News Desk

उद्धव ठाकरे म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज!

News Desk