HW News Marathi
देश / विदेश

‘कोरोना विषाणू’चे २ संशयित मुंबईत आढळले

मुंबई | चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना विषाणूचे २ संशयित रुग्ण मुंबईत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. चीनहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांमध्ये हे विषाणू आढळून आले आहे. या दोन्ही रुग्णांना सध्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत तब्बल २६ जणांचा बळी घेतला आहे. तर ८३० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे चीनमध्ये वुहानसह ९ शहरे बंद ठेवण्यात आली आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे याच वुहानमध्ये ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. या विषाणूबाबत दक्षता घेत मुंबई महापालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयाला याबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावरुन कस्तुरबा रुग्णालयात कोरोना विषाणूचती लागण झालेल्या रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे, जेणेकरुन त्यांना इतर रुग्णांपासून दूर ठेवता यावे.

जगभरात कोरोना विषाणूची भिती पसरली आहे. सरकारच्या निर्देशानुसार, भारतात १८ जानेवारीपासून देशभरातील सात विमानतळांवर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी स्क्रिनिंग करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबईतही चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत १ हजार ७३९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. यातील सहा प्रवाशी हे महाराष्ट्रातील आहेत. यात तीन पुणे, तीन प्रवासी मुंबईतील आहेत. या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तराखंड : हिमकडा कोसळल्याने नद्यांना आला प्रचंड मोठा पूर, भीषण जलप्रलयात १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती

News Desk

सोपोर, बडगावमध्ये दहशतवादी, भारतीय लष्कराची शोध मोहीम

swarit

तब्बल 150 वर्ष ‘इथे’ होळी साजरी झालीच नाही; धक्कादायक कारण आलं समोर

Manasi Devkar