HW News Marathi
महाराष्ट्र

नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात उदयनराजेंना मिळाला डच्चू !

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (७ जुलै) सायंकाळी ६ वाजता मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या एकूण ४३ मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. विशेषतः या मंत्रिपदाच्या यादीमध्ये ४ मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. दरम्यान एकीकडे महाराष्ट्राचे ४ नेते केंद्रात गेलेले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या उदयनराजेंना मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न देता डावलण्यात आलं आहे.

उदयनराजेंना डावलललं

खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने मोठ्या प्रयत्नाने भाजपमध्ये समाविष्ट करून साताऱ्यात आपली ताकत वाढवली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थिती मध्ये उदयनराजे भाजपवासी झाले. लोकसभेची पोट निवडणूक पुन्हा लागल्या नंतर साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा घेण्यात आली. मात्र उदयनराजे यांनी घेतलेल्या पक्ष बदलाच्या निर्णयाला सातारच्या जनतेने नाकारल्याने उदायनराजेंचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर देखील त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त

उदयनराजेंना पुढे भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी आशा त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना होती आणि अशा चर्चा ही जोरदार रंगल्या होत्या. मात्र आता (७ जुलै) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत उदयनराजे भोसले यांना कुठंही स्थान देण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळातील ४३ नव्या नेत्यांची नावं

१. नारायण तातू राणे

२. सरबनानंद सोनोवाल

३. डॉ. वीरेंद्र कुमार

४. ज्योतिरादित्य सिंधिया

५. रामचंद्र प्रसाद सिंग

६. अश्विनी वैष्णव

७. पशुपती कुमार पारस

८. किरेन रिजिजू

९. राज कुमार सिंग

१०. हरदीपसिंग पुरी

११. मनसुख मांडवीया

१२. भूपेंद्र यादव

१३. पुरुषोत्तम रुपाला

१४. जी किशन रेड्डी

१५. अनुराग सिंग ठाकूर

१६. पंकज चौधरी

१७. अनुप्रिया सिंग पटेल

१८. सत्यपाल सिंग बघेल

१९. राजीव चंद्रशेखर

२०. सुश्री शोभा करंडलाजे

२१. भानू प्रताप सिंग वर्मा

२२. दर्शना विक्रम जर्दोश

२३. मीनाक्षी लाड

२४. अन्नपूर्णा देवी

२५. ए. नारायणस्वामी

२६. कौशल किशोर

२७. अजय भट्ट

२८. बी. एल. वर्मा

२९. अजय कुमार

३०. चौहान देवीसिंह

३१. भगवंत खुबा

३२. कपिल मोरेश्वर पाटील

३३. प्रतिमा भौमिक

३४. सुभाष सरकार

३५. भागवत किशनराव कराड

३६. राजकुमार रंजन सिंग

३७. भरती प्रवीण पवार

३८. बिश्वेश्वर तुडदु

३९. शंतनू ठाकूर

४०. मुंजापरा महेंद्रभाई

४१. जॉन बारला

४२. एल. मुरुगन

४३. नितीश प्रामाणिक

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, खासदार रक्षा खडसेंचं मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांना पत्र

News Desk

गुगल मॅपवर कोरोनाची प्रतिबंधात्मक क्षेत्रं दिसणार

News Desk

मुख्यमंत्री यांच्या पाठोपाठ आता पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र!

News Desk