HW News Marathi
महाराष्ट्र

“मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”- उदयनराजे भोसले

सातारा | भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज (१९ जानेवारी) ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी उदयनराजे यांनी जोरदार फटके बाजी केली आहे. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, अशी जोरदार फटकेबाजी उदयनराजे यांनी केली आहे.

साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. त्याचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरून टीका होत असतानाच उदयनराजे यांनी त्यावरून जोरदार फटकेबाजी केली. मंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी आधी आमदार आणि खासदार आहेत ना. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही. भरपूर खाज असलेला खासदार आहे, असं त्यांनी सांगितलं.

उदयनराजे इतक्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे ग्रेड सेपरेटरच्या कामाला उशिर झाल्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी त्यांच्या खास अंदाजात फटकेबाजी केली. काम करताना एक लक्षात घ्या थोडा त्रास होणार. पोरंही एका दिवसात होत नाहीत. नऊ महिने लागतात. त्रास तर होतोच, त्रास झाल्याशिवाय मुलंही होत नाहीत… हे तर ग्रेड सेपरेटर आहे, थोडा त्रास तर होणारच, असा चिमटाही यावेळी त्यांनी त्यांनी काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसैनिकाला दादा भूसेंचे प्रत्युत्तर

News Desk

महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार! – नाना पटोले

Aprna