HW News Marathi
Covid-19

देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसींचा साठा कमी पडला नसता !

मुंबई । कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना देशात कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात आहे. देशात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र महाराष्ट्राला लसींचा तुटवडा भासत आहे. याच लसीकरणाच्या मुद्द्याचे राजकीयीकरण होऊन केंद्र आणि राज्यात जुंपली आहे. तर याच मुद्द्यावर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “देशात फॅमिली प्लॅनिंग केले असते तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता’, असे उदयनराजे भोसले म्हणाले. “लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचे वाटप झाले पाहिजे. त्यावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही”, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले.

ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारने लागू केलेला कडक निर्बंधांवर बोलताना उदयनराजे म्हणाले की, “मी व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही.” त्याचप्रमाणे, “व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस आहेत. व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे .उद्या बँका हप्ते भरण्यासाठी मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्या”, अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.

“कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार?”, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

“भिडे गुरूजींविषयी मला प्रश्न विचारू नका”

संभाजी भिडे यांनी कोरोनाबाबत केलेल्या धक्कादायक विधानाबाबत उदयनराजेंना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, “माझे प्रश्न मला विचारा. कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते कोणत्या अर्थाने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करून बोलेन.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ११,२०४ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

कॅशियर म्हणून जॉईन व्हा, VP पोस्टपर्यंत पोहोचा…अट एकच ! आक्षेपार्ह टिकेवर अमृता फडणवीस संतापल्या

News Desk

१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू होणार

News Desk