सातारा |राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचा धमाका सूरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जबरदस्त धक्का बसला आहे. उदयनराजे यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने दणदणीत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र, उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे.
सातारा शहरा लगत जे कोंडवे हे गाव उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतले होते. कोंडवे ग्रामपंचायतीसाठी उदयनराजे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उदयनराजे गटाने खास रणनीती आखली होती. मात्र, त्यात ते अपयशी ठरले आहेत. या निवडणुकीत कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला १३ पैकी केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर आमदार शिवेंद्रसिंह राजे गटाला १० जागांवर घवघवीत यश मिळालं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.