HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

उपमुख्यमंत्र्यांना वाटतं त्यांच्या दौऱ्याने आम्हाला दौरे पडतील – उदयनराजे भोसले

सातारा | कायम वादाच्या भोवऱ्यात असणारे आणि वादवादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा काही वक्तव्ये केली आहेत. भारत-चीन तणाव म्हणजे येड्याचा बाजार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. कोरोनामुळे मृत्यू वाढत असल्याबाबत लक्ष वेधले असता जन्माला येणार तो मरणारच, मरायचंच आहे तर खाऊन मरा, असा सल्ला देखील यावेळी उदयनराजेंनी दिला आहे. तसेच, संपूर्ण राज्यात कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची मागणी उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली आहे.

भारत चीन मुद्द्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याला केलेल्या भेटीवरही त्यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या या दौऱ्या दरम्यान त्यावेळी त्यांना निवेदन का दिले नाही असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल मला अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यांना वाटते माहिती कळाली तर आम्हाला दौरे पडतात त्यामुळे कोणाचे दौरे समजत नाही. पण आम्हालाही सर्व समजतं, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

तर, राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना शासनाकडून विविध श्रेणीनुसार मानधन दिले जाते. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून मानधन वितरित केले नाही. त्याचे त्वरित वितरण करावे व भविष्यात मानधन नियमित मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील नाट्यगहे, ग्रंथालये पुरेशी सुरक्षा घेऊन सुरू करावीत. लोक कलाकारांना ही शासनाने भरीव मदत करावी, अशी देखील मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Related posts

शिवराज सिंह चौहान यांच्या काळात दोन हजार कोटींचा घोटाळा !

News Desk

कोण होते मराठी भाषेतील पहिले पत्रकार ?

News Desk

भाजपसाठी २०१९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा !

News Desk